आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा सुरू असतानाच, अचानक काल प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर व एकनाथ शिंदे यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : बहीण- भाऊ पुन्हा एकत्र; पंकजा मुंडे पोहचल्या ब्रीच कँडी रूग्णालयात, भाऊ धनंजय मुंडेंना म्हणाल्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड खलबतं झाली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
दरम्यान, आंबेडकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अपघातांच्या मालिका सूरूच; आमदार बच्चू कडूंचा अपघात, उपचारासाठी रूग्णालयात दाखल”
“शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ महिला नेत्यानं केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश”