आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना, काही महिलांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू असतानाच या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जखमी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, रोशनी शिंदे, यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टवरुन राजकारण तापलं होतं. तसेच याच पोस्टवरुन वाद उफाळला आणि रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. तर रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच मारहाण प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी
मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….
मराठमोळ्या ऋुतुराज-तुषारपुढे लखनाै हतबल, रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा लखनाैवर 12 धावांनी विजय