आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अजित पवारांच्या बंडानतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात वादविवाद सुरू असताना शिंदे गटाच्या 16 आमदारांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : तुमची असेल-नसेल ती, सगळी ताकद लावा अन्…; येवल्यातील जाहीर सभेतून शरद पवारांचं, पंतप्रधान मोदींना जाहीर आवाहन
शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांना नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस पाठवणार आहे. आमदारांची बाजू ऐकून घेण्यासाठी राहुल नार्वेकर त्यांना ही नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट; म्हणाल्या, तुफानाला तोंड द्यायला…
अजित पवारांच्या शपथविधीआधी 30 जूनला नेमकं काय घडलं?; प्रफुल्ल पटेलांनी सांगितली आतली बातमी, म्हणाले…
…तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला