आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
बुलडाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ही यात्रा काढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत आता शिवसेना सहभागी होणार का?, असा सवाल सर्वांना पडला आहे. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी पत्रव्यवहार करणार असल्याचं नाना पटोले यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना, काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी होतात का? हे आता लवकरच सर्वांना कळेल.
दरम्यान, काँग्रेसच्या या प्रस्तावावर शिवसेनेनं सावध भूमिका घेतली असून, भारत जोडो यात्रेबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असं शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश
माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती नको; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने खळबळ