आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं असून मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सही असलेले नियुक्ती पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आलं आहे. मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत राज ठाकरेंच्या निर्णयानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा : “मनसे ‘या’ ठिकाणी लावणार दिवसातून 5 वेळा हनुमान चालिसा”
दरम्यान,आपली ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल” असं या पत्रात साईनाथ बाबर यांना उद्देशून म्हटलं आहे, तर वसंत मोरेंचा कुठलाही उल्लेख या पत्रात नाही.
महत्वाच्या घडामोडी –
…तर सोमय्या बाप-बेटांना जेलमध्ये जावंच लागणार; संजय राऊतांचा इशारा
“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरेंची नाराजी खुद्द राज ठाकरे दूर करणार, शिवतीर्थवर भेटीसाठी बोलावलं”
पॅट कमिन्सची वादळी खेळी; कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय