रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे.
नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आलं.
नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. तसेच नारायण राणेंना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत.
दरम्यान, यावेळी राणेंचे सुपूत्र निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे अखेर पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं,पण…; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं चॅलेंज
…पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- देवेंद्र फडणवीस
सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, अन्यथा…; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले