आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. शिंदे यांनी शिवसेनेचे एकूण 40 आमदार आपल्या गटात सामील करून घेतले. यामुळे शिवसेना अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. अशातच एक मोठी बातमी आता समोर येत आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण शिंदेंना सोडा, अशी ऑफर त्यांनी फडणवीसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ
दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. आता ही वेळ निघून गेली आहे, उशीर झालाय, असं भाजपकडून उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
संजय राऊतांवर टीका करताना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…
…तर मी ‘सिलव्हर ओक’वरही जायला तयार; शिंदे गटातील आमदार दीपक केसरकरांचं मोठं विधान
शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; नारायण राणेंची भविष्यवाणी