Home महाराष्ट्र येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. शिंदे यांनी शिवसेनेचे एकूण 40 आमदार आपल्या गटात सामील करून घेतले. यामुळे शिवसेना अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

हे ही वाचा : संजय राऊतांवर टीका करताना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्थीकरीता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं दीपाली सय्यद यांनी ट्विट केलं.

दरम्यान,  दीपाली सय्यद सय्यद यांनी केलेल्या या ट्विटमुळं उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर मी ‘सिलव्हर ओक’वरही जायला तयार; शिंदे गटातील आमदार दीपक केसरकरांचं मोठं विधान

शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; नारायण राणेंची भविष्यवाणी

किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच; डॅशिंग नेते वसंत मोरेंचं शिंदे सरकारला आवाहन