मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत

0
298

मुंबई : इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

हे ही वाचा : Why I Killed Gandhi : नथुराम गोडसे भूमिकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..“अफझल खानाचीही…”

इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

दरम्यान,सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. तर  दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या…; रूपाली पाटलांकडून मनसे उमेद्वारांचं अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here