“मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची कोयता व कुऱ्हाडीने वार करून हत्या”

0
322

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची कोयता आणि कुऱ्हाडीचे वार करुन हत्या करण्यात आली आहे.

मेहबूब यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहेच. आज संध्याकाळी 5.30 वाजता मेहबुब पानसरे यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना पुण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही बातमी पण वाचा : …तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

दरम्यान, जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. मौजे धालेवाडी गावाच्या हद्दीमध्ये त्यांनी जमीन घेतली आहे. या ठिकाणी वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी व इतर पाच जणांनी मेहबुब पानसरे व इतर दोघांवर कोयता, कुऱ्हाडीने हल्ला केला.या हल्ल्यात पानसरेंच्या मानेला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या घडामोडी –

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना, हिंदुस्तानात व्हावा हे न पटणारं; मनसेची संतप्त प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत

मोठी बातमी! राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here