आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना देखील निलंबन करण्यात आलंय.
सुप्रिया सुळे यांनी निलंबनानंतर हे प्रतिक्रिया दिली. आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. विरोधकांना हद्दपार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ही बातमी पण वाचा : 102 डिग्री ताप, अनेकवेळा उलट्या; जाणून घ्या आता कशी आहे दाऊदची तब्येत
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.
महत्त्वाच्या घडामोडी –
लेखिका-लघुपटकार अंजली कीर्तने काळाच्या पडद्याआड
मोठी बातमी! भाजपच्या गोटात धुसफूस; ‘या’ नेत्याचा पत्रकार परिषद घेत राजीनामा
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका