Home महाराष्ट्र “मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र”

“मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबै बँकेच्या निवडणूकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पहायला मिळालं आहे.

हे ही वाचा : धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, मृत माणसांच्या नावांवर पैसे लुटले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्याशी चर्चा झाली. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं पहायला मिळालं आहे. तसेच या बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्यास तिन्ही पक्ष बंडखोरांवर थेट कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला परवानगी; सुप्रीम कोर्टाचा दिलासा

जयंत पाटलांवर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

राष्ट्रवादीत प्रवेश करताना रूपाली पाटील झाल्या भावूक, म्हणाल्या…