मुंबई : कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, असे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांना पाठवलं होतं. हे पत्र वाचल्यानंतर शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळाली.
मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे, असा खुलासा राज ठाकरे यांनी केलाय.
दरम्यान, आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बासनात गुंडाळलेल्या या प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ताठर, गडी ऐकायलाच तयार नाही”
महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा नवा व्हिडीओ; पहा व्हिडिओ
…ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गँग; नितेश राणेंची टीका
रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडिओ होतोय व्हायरल