Home महाराष्ट्र “मोठी बातमी! संभाजीराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! संभाजीराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संभाजीराजेंनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व आमदारांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक राज्यसभेची जागा, तर भाजपला दोन जागांवर विजय मिळेल. तर सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे संख्याबळ नाही. त्यामुळे  मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली.

हे ही वाचा : “मनसेत सुसाट पक्षप्रवेश; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून अनेक मुस्लिम युवकांचा मनसेत प्रवेश”

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

“रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, रामदास आठवलेंचे जुने सहकारी एम.डी.शेवाळे यांचं निधन”

“….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”