आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर अनेक आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून, कधीही काही होऊ शकतं असे वक्तव्य शिरसाट यांनी केला आहे.
अंबादास दानवे यांनी एकदा मला फोन केला. तसेच सुषमा अंधारे डोक्याच्यावर झाल्या असल्याचे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या सभेसाठी आलेल्या सुषमा अंधारे यांना सुभेदारी शासकीय विश्रामगृहात थांबवले असताना, त्यांनी थेट मातोश्रीवर फोन करून वहिनींकडे तक्रार केली. त्यामुळे लगेच दानवे यांना मातोश्रीवरून फोन आला आणि अर्ध्यातासात अंधारे यांची व्यवस्था रामा हॉटेलमध्ये करण्यात आली, असल्याचं शिरसाट म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराला फडणवीसांचा धक्का; विधानपरिषदेत केली ‘ही’ मोठी घोषणा
“World Women Boxing Championship! भारताच्या स्विटी बोराने तब्बल 9 वर्षानं पटकावलं सुवर्णपदक”
“ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”