मोठी बातमी! नाना पटोलेंनी दिली नितीन गडकरींना काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर, म्हणाले…

0
296

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज आहे. तेथील परिस्थिती चांगली नाही. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे मी आमंत्रण देतो. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. लवकरच नितीन गडकरी यांची भेट घेणार, अशी ऑफर नाना पटोलेंनी यावेळी दिली. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : “पंकजा मुंडेच्या पदरी पुन्हा निराशा; ‘या’ 2 नेत्यांवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

दरम्यान, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. पक्षामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, भाजपमध्ये तसे नाही. अलीकडे नितीन गडकरी यांची पक्षात ज्या प्रकारची अवस्था झाली आहे, ती योग्य म्हणता येणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पुण्यात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील एकत्र; चर्चांना उधाण

“शिवसेनेच्या ताकदीत वाढ; नाशिकमधील अनेक मुस्लीम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”

मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेला सोबत घेण्याची गरज नाही; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here