आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठी भाषादिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांंनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर एक नवी जबाबदारी सोपविली आहे.
हे ही वाचा : 2024 मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी
गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रिय होताना दिसत आहेत. अशातच आता अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेने आज परिपत्रक जारी करत याबद्दलची माहिती दिली आहे.
आज ‘मराठी भाषा गौरव’ दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी श्री. अमितजी राजसाहेब ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित या महत्वाच्या नव्या जबाबदारीसाठी श्री. अमितजी ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/QMSYGJnApQ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 27, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“सर जडेजा-श्रेयस अय्यरची विस्फोटक मॅच विनिंग खेळी, भारताचा श्रीलंकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”
मराठी भाषावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व पक्षांना खडसावलं, म्हणाले…
आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…