“मोठी बातमी! तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड”

0
222

मुंबई : आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने मुंबईत अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांवर 2015 मध्ये आलेल्या फँटम या सिनेमाशी संबंधित व्यवहारावरुन धाडी पडल्या आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती करत आहेत. या कलाकारांनी आयकर चोरी केल्याचा संशय आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून होत आहे.

दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“तरूणीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा”

“याॅर्करकिंग जसप्रित बुमराहची पडली विकेट, लवकरच अडकणार विवाहबंधनात”

राहुल गांधींनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात- आशिष शेलार

“शिवसेनेचा वाघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पिंजऱ्यात अडकलाय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here