मोठी बातमी! वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात एम एस रेड्डी निलंबित

0
179

मुंबई : मेळघाटमधील वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम एस रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रेड्डी यांचं देखील नाव असून त्याच आधारावर रेड्डी यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपाकडून रेड्डी यांच्या अटकेची मागणी लावून धरली जात आहे. मंगळवारी अपर मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर भाजपाकडून ठिय्या आंदोलनही करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी मेळघाटमध्येच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप – राष्ट्रवादीचं सोडा; पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

पवारांची तब्येत बिघडली माहित आहे, पण सरकारचं माहित नाही- चंद्रकांत पाटील

ईडीकडून चौकशीची तारीख आली की एकनाथ खडसे यांना कोरोना होतो- गिरीश महाजन

“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here