आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.
हे ही वाचा : ‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण
दरम्यान, आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनकडे निघाले आहेत. राज्यपालांना भेटून राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे देणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे त्यांच्या विधानपरिषद आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; मनसेचं एकमेव मत भाजपाच्या पारड्यात
भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
मोठी बातमी! म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी मोठा खुलासा!