मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज सभा झाली. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं होतं. अशातच मुंबई मधून मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबईत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : सुषमा अंधारेवर टीका करताना, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची जीभ घसरली,म्हणाले, तिनं काय काय लपडी…
विशेष म्हणजे या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरुन चर्चा झाली, या विषयाची माहिती समोर आली असून “राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
बारामतीसाठी भाजपचा गेम प्लॅन; तब्बल 52 शाखांचं उद्घाटन; थेट ‘पवार’ कुटुंबाला केलं चॅलेंज
52 नव्हे, 152 कुळं जरी खाली उतरवली तरी…; उद्धव ठाकरेंचा, बावनकुळेंना इशारा
सत्ता गेल्याचं दु:ख नाही, मात्र…; मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल