आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यामध्ये उत्तर सभा घेतली. मात्र आता या सभेच्या ठिकाणी झालेल्या एका कृतीमुळे राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यामध्ये राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंविरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.ठाण्यामधील सभेमध्ये राज यांनी स्टेजवरुन तलवार म्यानातून काढून दाखवल्याने त्यांच्यासह सुमारे 10 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका, अन् राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता राज ठाकरेंच्या भेटीला ; राजकीय चर्चांना उधाण
राज ठाकरे काल साडेसातच्या सुमारास मूस रोडवरील सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा भगवी शाल आणि तलवार देऊन स्वागत करण्यात आलं. यानंतर राज यांनी म्यानातून तलवार बाहेर काढून ती उंचावून दाखवली. याच प्रकरणी आता ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कायदा कलम 34 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 व 25 प्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह 7 ते 8 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पवारांच्या घरावरील हल्ल्याची निष्पक्षपणे चाैकशी व्हावी- रामदास आठवले
“मोठी बातमी! सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सूरू”