“मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री”

0
343

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयात आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

हे ही वाचा : शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाईक यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच खबरदारीची उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानामध्ये सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; आता पिंपरीतील ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कपात कमी करणार की नाही?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here