Home महाराष्ट्र मोठी बातमी! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक; राज्य सरकारचा...

मोठी बातमी! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा विचार करत आहोत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आहे.

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या आता नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागानं 2 दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर सरकारने शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

दरम्यान, दिनांक 17 ऑगस्ट,2021 पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असं 10 ऑगस्टला काढलेल्या शासन निर्णयात म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

‘अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ, भाजपचा ‘हा’ मोठा नेता अडचणीत”

…तरी पंकजाताईंच्या सत्कारानंतर यात्रेची पुढची वाटचाल करणार; केंद्रीय मंत्री भागवत कराड भावुक

मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी

“ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”