आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांच्यावर ईडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचा हा बडा नेता ईडी च्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ वकील आणि आरटीआय कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी येडियुरप्पा यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडे धाव घेतली आहे. अब्राहम यांनी येडियुरप्पा यांच्यासह त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर व इतर सहा जणांच्या चौकशीची मागणी करीत विशेष न्यायालयात याचिका केली होती.
हे ही वाचा : आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले, पण…
दरम्यान, बिगर भाजपशासित राज्यांत ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात होती. आता अशातच भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा यांच्यावर ईडी च्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गट-मनसे युती होणार?; राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…
“राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, आगामी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मनसे-शिंदे गट युती होणार?”