मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे, असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. @CMOMaharashtra @bb_thorat @INCIndia pic.twitter.com/R6mBEdDqV9
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही- निलेश राणे
…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी केला परळी दौरा रद्द
“पुन:च्छ हरिओम करायची वेळ आली आहे; हळूहळू आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करु”
ठाकरे सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’; वाचा 3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार तर कोणत्या गोष्टी बंदच