आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मात्र त्याआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मातोश्रीमध्ये जाऊन शिशिर शिंदे यांनी त्यांचं राजीनामा पत्र सुपूर्द केलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे.
पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेतेपदी वर्णी लागली होती.
ही बातमी पण वाचा : “सांगली हादरली; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, 8 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार”
दरम्यान, 2018 साली शिशिर शिंदे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा शिशिर शिंदे यांनीही राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडली होती. आता शिशिर शिंदे कोणता निर्णय घेतात? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापसी
“…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते”