Home महाराष्ट्र मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का; विधानसभेच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का; विधानसभेच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मात्र आता तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेनं तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता.

दरम्यान, 2015 मध्ये आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्याने, शिवसेनेने पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांच्याविरोधात नारायण राणे होते. मात्र तृप्ती सावंत यांनी बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

जनमानसात अस्वस्थता..,तत्काळ पावलं उचला; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षेचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार”

“गृहमंत्रिपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा”