मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याचे आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आले आहे. तसेच आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल करावा लागला. आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे 19 सप्टेंबर किंवा त्यानंतर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थान राॅयल्सला या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीआधी मोठा धक्का बसला आहे. राजस्थान राॅयल्सचा आक्रमक विकेटकीपर सलामी फलंदाज जॉस बटलरने उर्वरित आयपीएलच्या सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे राजस्थानला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, बटलरने या 14 व्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. बटलरने 7 सामन्यांमध्ये 153 च्या स्ट्राईक रेटने आणि 36.28 च्या सरासरीने 1 शानदार शतकासह 254 धावा केल्या होत्या. तसेच बटलरने या हंगामात 124 धावांची विस्फोटक शतकी खेळी केली होती. ही खेळी बटलरच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
महत्वाच्या घडामोडी –
“अहमदनगरमध्ये महापाैरपदाच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र”
“महाविकास आघाडीतील ‘आणखी’ एक पक्ष स्वबळावर मैदानात”
“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”
14 दिवसाचं अधिवेशन झालं तर…; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका