Home महाराष्ट्र राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस संजय रोडगे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रोगडेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.

काल संजय रोगडे यांनी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

हे ही वाचा : उध्दव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल

माजी आमदार विजय भांबळे यांच्या त्रासाला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे रोडगे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, रोडगे यांच्या भाजप प्रवेशाने परभणी जिल्ह्यात पक्षाला मोठे बळ मिळणार आहे. संजय रोडगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय समिकरण बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! शिंदे गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

चेन्नईवर गुजरात भारी; शुभमनच्या झंझावातामुळे गुजरातचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय

“सुषमा अंधारे यांच्या तक्रारीनंतर, संजय शिरसाटांवर 48 तासांच्या आत कारवाई होणार”