Home महाराष्ट्र “सुषमा अंधारे यांच्या तक्रारीनंतर, संजय शिरसाटांवर 48 तासांच्या आत कारवाई होणार”

“सुषमा अंधारे यांच्या तक्रारीनंतर, संजय शिरसाटांवर 48 तासांच्या आत कारवाई होणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली होती. मात्र, आता त्यांना ही टीका भोवण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अंधारे यांच्या तक्रारीवर 48 तासांच्या आत कारवाई करून महिला आयोगाला अहवाल सादर करा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : फडणवीसांची मोठी खेळी; ठाकरे गटाच्या ‘या’ आक्रमक नेत्या करणार भाजपमध्ये प्रवेश

अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला मिळाली. त्यानंतर आयोगाने संभाजीनगर पोलीस आयुक्तांना यासंबंधी चौकशी करून कारवाई करण्याची आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. हा अहवाल 48 तासांमध्ये सादर करण्यास सांगितलं होतं. उद्या तो कालावधी संपेल. तेव्हा आपल्याला समजेल की, पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पंढरपूरातून सलग 6 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचं निधन”

गोपीनाथ मुंडेंबद्धल एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… भाजाप मध्ये त्यांना…

“…तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील”