Home पुणे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का; पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांचे पद रद्द

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का; पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांचे पद रद्द

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.  पक्षाकडून व्हीप बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. व्हीप डावलल्याने भोर पंचायत समितीच्या सभापतीसह दोन सदस्यांचे पद रद्द केले गेले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदाच पक्षाचे व्हीप डावलल्याने ही कारवाई केली गेली आहे. सभापती दमयंती जाधव, सदस्य श्रीधर किंद्रे आणि मंगल बोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं आहे.

पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी पक्षाने बजावलेल्या व्हीपचे पालन न केल्याने राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टीही केली होती. त्यानंतर कायदेशीर सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; किरीट सोमय्याची प्रतिक्रिया, म्हणाले…

चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊत म्हणतात…

शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध