Home पुणे राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का; रुपाली पाटलांचा मनसेला रामराम

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का; रुपाली पाटलांचा मनसेला रामराम

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या रणरागीनी रुपाली पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केलाय. पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

हे ही वाचा : भाजपाला मोठा धक्का; 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं कळतंय. रुपाली पाटील यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज होत्या त्यामुळे पक्षाला रामराम ठोकतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

रुपाली पाटील यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हिंमत असेल तर…; विधानपरिषद निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला ओपन चॅलेंज

औरंगाबादेत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय; जिल्हाध्यक्षांना पदावरुन काढलं!

“आजचा पराभव हा तर नाना पटोलेंचा पराभव, त्यांच्या मोगलाईमुळंच काँग्रेसचा पराभव झाला”