आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पंजाबमध्ये एकहाती सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पद सोडावं लागलं. यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस नेत्यांवर नाराज असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
दरम्यान, अमरिंदर सिंग हे आज 4.30 वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसेच अमरिंदर सिंग यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”
“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेस जिवंत, अन्यथा हे मेले असते”
आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात; कोल्हापूरात सोमय्यांचा एल्गार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान