आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबादः फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या दोन वॉर्डांच्या पोटनिवडणुकीत भाजपला दणदणीत पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीने येथे दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला. विशेष म्हणजे ही जागा आधी भाजपच्या ताब्यात होती.
फुलंब्री नगरपंचायतीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संख्याबळ यापूर्वीच जास्त होते. महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या आता पाचवरून सातवर पोहोचली आहे.
फुलंब्री नगरपंचायतच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा आनंदा ढोके यांचा 279 मते घेऊन विजय झाला आहे. तर वॉर्ड क्रमांक 8 मध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अर्चना उमेश दुतोंडे यांनी 434 मते घेऊन विजय मिळवला.
हे ही वाचा : “मुख्यमंत्री 2 दिवसात सभागृहात येतीलही, पण पंतप्रधान तंदुरुस्त, ते संसदेत का येत नाहीत?”
पूजा आनंदा ढोके यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार विमल ढोके यांना 277 मते मिळाली. केवळ दोन मतांनी राष्ट्रवादीच्या पूजा आनंदा ढोके यांचा विजय झाला. तर अर्चना उमेश दुतोंडे यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार रुपाली बनसोडे यांना केवळ 290 मते मिळाली.
दरम्यान, आता फुलंब्रीतील या दोन्ही जागा पोटनिवडणुकीत भाजपच्या हातातून गेल्या आहेत. या विजयाचा जल्लोष साजरा करताना महाविकास आघाडीच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसील आवारात फटाके फोडले. तसेच रस्त्यावर विजयी रॅली काढण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी –
“भास्कर जाधव सोंगाड्या; काल राष्ट्रवादीचा होता, आज शिवसेनेचा आहे, उद्या भाजपचाही होईल”
“नगरपंचायत, महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडीने मारली बाजी; भाजपला पराभवाचा धक्का”
“पडळकरांनी अजित दादांवर केेलेले आरोप म्हणजे, स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी केलेला भाबडा प्रयत्न”