नवी दिल्ली : कोरोनामुळे नोकरी गमवावी लागलेल्यांना पुन्हा सक्षमपणे उभं करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. देशात आर्थिक मंदीचं सावट घोंघावत असतानाच निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन ही महत्वाची घोषणा केली.
रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे. सरकारच्या या नव्या योजनेनुसार ज्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केली नाही. मात्र 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान ज्यांची नोकरी गेली आहे आणि ज्यांचा पगार 15 हजाराचा आत आहे, अशा बेरोजगारांना पीएफचा लाभ देण्यात येणार आहे., असंही सीतारमण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे, असं सीतारमण यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत रोजगार योजने अंतर्गत आतापर्यंत 1.59 लाख संस्थांना 8300 कोटी रुपयांचं सहाय्य करण्यात आलं आहे. यात 1 कोटी 21 लाखांपेक्षा अधिक लोकांना लाभ झाला आहे., असं सीतारमण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”
“तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही”
“केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त”