आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देण्याची शक्यता आहे, असे संकेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडन अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांना अपात्र का करू नये? असं नव्हतं तर त्या 16 आमदारांना अपात्र केलं होतं, असं नरहरी झिरवळ म्हणाले.
ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदी, अमित शहांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांची, चित्रा वाघ यांनी काढली लायकी, म्हणाल्या…
‘मी सर्व बाजूंनी अभ्यास करून निर्णय घेतला. घटनेचा, सभागृहाचा, पक्षाच्या गटाचा, कोणाचे अधिकार कुणाला आहेत? याबाबत अभ्यास करूनच 16 आमदारांना अपात्र केलं होतं’, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत. तसेच कोर्ट, 16 लोकांना अपात्र केलं आहे, ते योग्य आहे, असाच निर्णय देऊ शकतं, असंही झिरवळ म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदी, अमित शहांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांची, चित्रा वाघ यांनी काढली लायकी, म्हणाल्या…
“कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसची किती जागांवर मुसंडी?”
“एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री”