Home छत्रपती संभाजीनगर “महाविकास आघाडीच्या सभेआधीच ठाकरे गट-शिंदे गटाचे ‘हे’ नेते एकत्र, चर्चांना उधाण”

“महाविकास आघाडीच्या सभेआधीच ठाकरे गट-शिंदे गटाचे ‘हे’ नेते एकत्र, चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकार आजपासून आपल्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं राजकीय वातावरण तापलं आहे.

एकीकडे सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला सोबत हजेरी लावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा : शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; भेटीत ‘या’ विषयांवर झाली चर्चा

दरम्यान, कर्णपूरा मैदानात अहिंसा रन मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे नेते संदीपान भूमरे तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकत्र हजेरी लावली. तसेच एकाच व्यासपीठावर शेजारी बसून हसत हसत चर्चा करताना दिसून आले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मार्क वूडपुढे दिल्लीचे लोटांगण; लखनाैचा दिल्लीवर 50 धावांनी दणदणीत विजय

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा”

तब्बल 10 महिन्यांनी तूरूंगाबाहेर येताच, नवज्योत सिंग सिद्धूंचं, राहूल गांधींबद्दल मोठं विधान, म्हणाले…