मुंबई : सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
राज्याचा गृहमंत्री जर पोलिसांना खंडणी गोळा करायला सांगत असेल तर या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते, असं म्हणत मुळात हे ठाकरे सरकार जातेचा पैसा लुटण्यासाठी बनलं आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या पत्रावरून अनिल देशमुखांकडून वाझेंना दरमहा 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे उघड झाले. पवार साहेबांना माहिती नव्हती असं असू शकत नाही. उद्धव ठाकरेंना briefing देऊन सुध्दा त्यांनी काही केलं नाही म्हणजे त्यांचा पण 100 कोटी मध्ये हिस्सा होता, असं म्हणत निलेश राणेंनी शरद पवारांवरही टीका केली आहे.
राज्याचा गृहमंत्री जर पोलिसांना खंडणी गोळा करायला सांगत असेल तर या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते..
मुळात हे ठाकरे सरकार जातेचा पैसा लुटण्यासाठी बनलं आहे..— Amar Warishe (@AmarMWarishe) March 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भारताचा इंग्लंडला ‘दणका’ सामना जिंकत मालिकाही घातली खिशात
राज्याचे पर्यटन आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण
100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- नारायण राणे
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…