आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पंढरपूर : गणेशोत्सव परवापासून सुरु झाला आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे. यावेळी पाटलांनी माध्यमांशी बोलताना, शिवसेनापक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ईश्वर चरणी साकड घातलं.
मातोश्रीच्या दारात सुख, शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना शहाजी बापू पाटील यांनी गणरायांकडे केली आहे. यावर आता शिवसेना नेत्यांनी पलटवार केला. पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी यावर प्रतिक्रिया देत शहाजी बापूंना टोला लगावला आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची भेट; चर्चांना उधाण
गणेश इंगोले यांनी काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांना टोला लगावला आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके…. आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या, असा जोरदार टोला इंगोले यांनी यावेळी शहाजी बापूंना लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
येत्या 15 दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चाचा, शिंदे सरकारला इशारा
“शिंदे गटाला धक्का; 15 दिवसांपूर्वी प्रवेश केलेला कोल्हापूरचा ‘हा’ नेता पुन्हा स्वगृही परतला”
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; गणपतीचे घेतले दर्शन, म्हणाले..