आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत या विमानतळाचा लोकार्पण सोहळा होत आहे, यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतोय याचा अभिमान वाटतोय. कोकणातील जनतेला माहीत आहे की हे त्यांच्या दादानीच केलं आहे” आजचा क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री आले त्यांचं स्वागत अभिमानाने आम्ही करतोय, या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये याची दक्षता आम्ही घेऊ, असं नितेश राणे म्हणाले.
विमानतळाचं काम कोणी केलंय हे सांगायची गरज नाही. पहिला शिवसेनेच्या वैभव नाईकांनी विरोध केला आणि नंतर ब्लास्टिंगचा ठेका मिळवला. शिवसेनेचे अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते मग त्यांनी का नाही परवानगी आणली? राणे साहेब केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी अवघ्या 60 दिवसात परवानगी आणली, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येतो हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी पाठीवर हात मारून सांगितलं असतं नारायण मला तुझा अभिमान आहे, अशी भावनाही नितेश राणे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता शिवबंधनात अडकला
ड्रग्सप्रकरणी नवाब मलिकांचा भाजपावर आरोप; आता मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्यांच्या मदतीवेळी ‘कासव’; फडणवीसांची टीका
शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट