आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे हे, शिवसेनेचा एक जरी आमदार फुटला कर त्याला रस्त्यात तुडवा, असं म्हणताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “अखेर ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीला ग्रीन सिग्नल, ‘या’ दिवशी होणार युती”
बाळासाहेब ठाकरे आता जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणाऱ्या संजय राऊतांसह इतर सगळ्या नेत्यांना पायाखाली तुडवलं असतं, असं विधान संजय गायकवाड यांनी केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
वंदनीय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतदिनी विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/Unhgl4soKf
— Shivsena Communication (@ShivsenaComms) January 23, 2023
बाळासाहेब ठाकरे हयात असताना 1990-91 च्या आसपास शिवसेनेचे काही आमदार फुटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी ते आवाहन केलं होतं. आम्हीही शिवसैनिक म्हणून मोर्चे काढले होते. पण त्यावेळी जे आमदार फुटले होते, ते हिंदुत्वाशी गद्दारी करून फुटले होते. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी ‘त्यांना तुडवा’ असं सांगितलं होतं. आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करून नव्हे तरबाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन बाहेर पडलो आहोत. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या या राऊतासह सगळ्यांना पायाखाली तुडवलं असतं, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….
ठाण्यात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला खिंडार ; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?
ठाकरे गटाची ऑफर स्विकारणार का?; पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाल्या…