मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांना टोला लगावण्यात आला होता. त्यावर बाळासाहेब थोरातांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सामनातील अग्रलेख हा अपूर्ण माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. व्यवस्थित माहिती घेऊन लिहायला हवा होता. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की समाधानी होतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारसोबत भक्कम असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं असलं तरीही पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गद खदखद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मी असताना कुणीही आरक्षण हटवू शकत नाही”- रामदास आठवले
मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले?; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली…
अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा