मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतरवरुन शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेनं भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचं संभाजीनगर केलं. हे नामांतर लोकांनी स्वीकारलं. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपस त्याची काळजी नको, अलं अग्रलेखात म्हटलं आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत, काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणं मूर्खपणाचं आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…मग गांधीची हत्या करणारा गोडसे कोण होता?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल
तुम्हांला जर जमत नसेल, तर…; नवनीत राणांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन”
अरे बापरे…मला भीती वाटतेय त्यांची; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला