तब्बल 1 वर्ष, 5 महिन्यांनी नवाब मलिकांना जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
478

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांची या जामीनामुळे जवळपास 1 वर्ष 5 महिन्यांनी सुटका झाली. नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाबभाई मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, हि आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. सुप्रिया सुळेंनी याबाबत ट्विट केलं आहे.

ही बातमी पण वाचा : अमित शहांनी संसदेत मूर्खपणा केला, एवढ्या मोठ्या नेत्यांनी…; बच्चू कडूंचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाबभाई मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, हि आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ते लवकरच दोषमुक्त होतील हा विश्वास आहे., असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी ठाकरे – शिंदे गट आले पुन्हा एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“पंतप्रधानांबद्दलचं ‘ते’ विधान भोवलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला लोकसभेतून केलं निलंबित”

फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात; मनसे नेत्याचं केंद्रीय मंत्र्याला जोरदार प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here