आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचं विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे. यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत हे अधिवेशन नागपुरातच घ्यावे तसेच कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी केली आहे. यावरून आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : 2024च्या लोकसभेत भाजपा 418 जागांच्या खाली येणारच नाही; चंद्रकांत पाटलांटा दावा
अधिवेशनापासून पळ काढण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न… राज्य सरकारचे अधिवेशन फक्त 5 दिवसाचं… या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही…, असं ट्विट करत उमा खापरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अधिवेशनापासून पळ काढण्याचा @CMOMaharashtra सरकारचा प्रयत्न…
राज्य सरकारचे अधिवेशन फक्त 5 दिवसाचं…
या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही…@BJP4Maharashtra @BJPMM4Maha @ChDadaPatil @Dev_Fadnavis @SMungantiwar
— Uma Khapre (@KhapreU) November 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांची राज ठाकरेंबद्दल भावनिक पोस्ट, म्हणाले…
ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे राज्य सरकारचंच काम, केंद्र सरकारचं नाही- प्रीतम मुंडे
“सिंधुदुर्गात भाजपचा शिवसेनेला दणका; राणे पती-पत्नीचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश”