पुणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप एका तरुणानं केला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आव्हाडांच्या या कृतीचे समर्थन केलं आहे.
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. खुप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण. महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
मी एखादी प्रतिक्रिया दिली तर त्यावर वैचारिक मत मांडावे ते मला मान्य आहे. पण असं होताना दिसत नाही, एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वाने नेतृत्व स्विकारत असेल आणि तिच्यावर टिका करण्यासारखं हातात काहीच नसेल तर ,तिच्या चारिञ्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम सोशल मिडीयाच्या माध्यमातून होतो, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी खंत व्यक्त केली आहे.
समाजातील प्रत्येक क्षेत्रातील महिला आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ञास होतो. त्यांनी कोणाकडे आणि कितीदा न्याय मागायचा? आता सुरूवात झालीच आहे तर होऊन जाऊ देत. आव्हाडसाहेब आम्ही सोबत आहोत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी-
मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन देत नाहीत- किरीट सोमय्या
मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!
मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…
जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी