औरंगाबादेत आई- मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाने केला जन्मदात्या आईवर बलात्कार

0
426

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी आणि जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी घटना घडली आहे.

सिडको पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलावर आईने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता. शुभम भालेराव (वय 20) असं या आरोपीचं नाव आहे.

आरोपी शुभम भालेराव (वय 20) हा पीडित महिलेचा मोठा मुलगा आहे. त्याला दारू पिण्याचं व्यसन जडलं होतं. तसंच तो काहीही काम करत नव्हता. शुभम हा दारू पिण्यासाठी नेहमी पीडित महिलेला मारहाण करायचा. दारूच्या आहारी गेलेल्या या नराधम मुलाने पीडित महिलेवर गेल्या तीन महिन्यापासून अत्याचार केले.

दरम्यान, आपण केलेल्या या काळ्या कृत्याची कुठे वाच्यात होऊ नये म्हणून तो पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा.

महत्वाच्या घडामोडी –

भारताचा विराट विजय; 67 धावांनी उडवला विंडीजचा धुवा

मंत्रालयात आज बिनखात्याच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठक

“इतर राज्यातील नेते ही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here