औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निवडणुका आल्या म्हणून मी विकास कामे करायला आलो नाही. कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मला ही विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली असं करायचं नाही. काम पूर्ण करायचं आहे., असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना आतापर्यंत रखडली होती. कुणामुळे रखडली होती हे माहीत नाही. पण माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्त्वाचं आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ- LIVE https://t.co/gCXSSbDCQy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं रोख बक्षीस”
“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”
पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि कधी…; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला
आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी