बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे.
करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पत्रकार परिषदेपूर्वी आज पोलिसांनी करूणा मुंडे यांच्यासह त्यांच्या मुलाला स्थानबद्ध केलं.
करूणा मुंडे या आज 11 वाजता परळीत दाखल होणार होत्या. मात्र, त्या 2.30 वाजता परळीत आल्या. यानंतर वैद्यनाथ मंदिर परिसरात करूणा मुंडे आणि तिथे उपस्थित महिलांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर काही महिलांनी करुणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी करुणा यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतांना पोलिसांनी करुणा यांच्या गाडीची झाडाझडती घेतली. तेंव्हा त्यांना गाडीत एक गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने रिव्हाॅल्व्हर माझ्या गाडीत ठेवली; करूणा मुंडेंचा आरोप
आता मी विचारते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?; महिला सरपंच मारहाण प्रकरणी चित्रा वाघ संतापल्या
“राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल”
“शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे, तरीही म्हणतात पाठीत खंजीर खूपसलं नाही”